Thursday, June 4, 2020

सुखाचा शोध

सुख जेव्हा आपण शोधतो त्या वेळी आपल्याला बऱ्याच प्रकारचे सुख दिसतात आणि आपण आपल्याला हवं असलेलं सुखा बद्द्ल विसरतो आणि आपण इतरांना हवं असलेल्या सुख मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करतो. 
आपण म्हणून सुख मिळवून देणारे book वाचलं आणि लोकांना ऐकलं नाही आणि आपण स्वतः आपले सुखा बद्द्लचे विचार ठाम ठेवले आणि आपण त्या गोष्टींवर काम केलं तर आपण easily आपल्याला हवं ते मिळवूनघेऊ शकतो

Wednesday, June 3, 2020

यशस्वी

आयुष्यात यशस्वी होणं सोप्प आहे पण तो यश हाताळणे अवघड आहे. आणि यश जर चांगल्या प्रकारे हाताळला नाही गेला त्या यशाला काही किंमत राहत नाही.
आसपास अशी बरीच लोक सापडतात जी खूप यशस्वी आहेत पण ते त्यांच्या आयुष्यात सुखी नसतात कारण ते यश त्यांना हाताळता येत नाही म्हणून जवळची माणसं, अशी माणसं गमवतात

खुप जवळचं कुणी सोबत नसेल त्या यशाचं कौतुक करायला, तर यशाचा उपयोग काय? 
यशाला किंमत येते जेव्हा त्या यशाचं कौतुक आपल्या खूपच जवळच्या लोकांना असतं

नाहीतर वाळवंटात भटकणारा खूपच सुंदर त्या पक्षी सारखं वाटतं ज्याचं कौतुक करायला तिथे कोणीही नाही. 
त्याच्या तो सुंदरपणा वाया जातो 

कोरोना महासंकट

कोरोना च्या या  महा संकटात एक गोष्ट लक्षात आली आहे, आपण ज्याला इकॉनोमी म्हणतो आणि ज्याला जास्त चांगल्या परिस्थितीत टिकून ठेवायचा प्रयत्न करतो ती इकॉनोमी तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टींचा मागे खर्च केलेल्या तुमच्या पैशांवर आधार ठेवून आहे 

आणि महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींसाठी आपण राबतो आणि खूप मोठा वेळ आपल्या आयुष्याचा आपल्याला महत्व नसलेल्या गोष्टींचा उपयोग करण्याकरिता पैसा कमावण्या करिता घालवतो. 
हे करण्याकरता सरकार आपल्यांना भाग पाडते आणि आपण सरकार आणि उद्योगांचा मालिकांच्या षड्यंत्र ला बळी पडतो
आपण जर या गोष्टींना बळी पडलो नाही तर आपण कमी तणावाचं आणि जास्त सुखी आयुष्य जगू शकतो